फॅसिलिटिस्

1. विशेष शिक्षण पद्धती
Oral – Aural method वापरून शिकवणे

स्पीच थेरपी आणि श्रवण प्रशिक्षण
श्रवणयंत्र व इतर सहाय्यक साधनांचा वापर

2. तज्ज्ञ शिक्षक व कर्मचारी

कर्णबधिर मुलांना शिकवण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेले शिक्षक
स्पीच थेरपिस्ट, समुपदेशक, श्रवणतज्ज्ञ

संगणक विभाग

मुलांनी संगणकाच्या तासिकेला की-बोर्ड व माऊसचा वापर करून मायक्रोसॉफ्ट पेंट आणि टक्सपेंट मध्ये चित्र काढणे, रंग भरणे, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये चित्रे व शब्द तयार करणे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये इंग्रजी शब्द व अंक अक्षरी टाईप करणे, आयएसएम व्ही ६ ॲप चा वापर करून मराठीत शब्द टाईप करणे, तसेच मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट मध्ये अ‍ॅनिमेशन डिझाइन तयार करणे इत्यादी उपक्रम मुले करू शकतात. यावरून असे दिसून येते की संगणक शिक्षणामुळे मुलांची बौद्धिक क्षमता आणि सर्जनशीलता वाढीस लागते.

संगणकाचा इतिहास, संगणकाचे वेगवेगळे भाग आणि त्यांची कार्ये, माऊस व की-बोर्डचा योग्य वापर, तसेच प्रिंटरचा वापर कसा करायचा यासारख्या मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. पेंट, टक्स पेंट, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट यांसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून विविध प्रकारची डॉक्युमेंट्स कशी तयार करायची, त्यामध्ये बदल कसे करायचे, तसेच इंटरनेटच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती कशी मिळवायची याचेही शिक्षण दिले जाते.

संगणकाच्या माध्यमातून मुले अनेक गोष्टी शिकतात. मुख्य म्हणजे मुलांची शिकण्याची प्रक्रिया स्वतःच्या कृतीतून आणि कल्पकतेतून (ॲक्टिव्ह लर्निंग) घडते.

खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य

शाळेच्या इमारतीलगत प्रशस्त खेळाचे मैदान उपलब्ध आहे. तसेच ओपन जिम असून, तेथे विद्यार्थी विविध प्रकारचे व्यायाम करतात. बालवर्गातील मुलांसाठी झोके, घसरगुंडी, सी-सॉ इत्यादी विविध खेळणी उपलब्ध आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळांचे अनेक प्रकारचे क्रीडा साहित्य शाळेत उपलब्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थी अनेक बैठे खेळही खेळतात, यासाठी अत्याधुनिक क्रीडा साहित्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक, पोहणे अशा विविध क्रीडा प्रकारांत शाळेचे विद्यार्थी सहभागी होऊन दरवर्षी यशस्वी ठरतात. त्यांच्या सरावासाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे मैदान शाळेत उपलब्ध आहे.

कार्यशाळा माहिती

शाळेत एक स्वतंत्र कार्यशाळा आहे . जिथे हस्तकला व शिवणकाम या विषयांचे अभ्यासक्रम शिकवले जातात.त्याचबरोबर भरतकाम, शिवणकाम, रंगकाम, फुले तयार करणे, फाईल तयार करणे इ अनेक कौशल्ये लहानपणापासून विकसित केली जातात व पुढे हे विद्यार्थी विविध प्रकारचे बुके, हार, मांडणी, चित्रशैलीतील फ्रेम, मोत्यांच्या वस्तू, आकर्षक दिवे, विविध प्रकारच्या आहेराच्या पाकिटे, कापडी पिशव्या, क्रोशा तसेच भरतकामाचे रुमाल इ.विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात .या वस्तूंची विक्री केली जाते.

लहानपणापासून अनेक कौशल्ये ही मुले अवगत करतात ज्याचा उपयोग त्यांना पुढे स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी होतो व हे विद्यार्थी मोठे झाल्यानंतर ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात.

ऑडिओमेट्री रूम

ऑडिओमेट्री रूम म्हणजे ऐकण्याची क्षमता तपासण्यासाठी (ऑडिओमेट्री करण्यासाठी) तयार करण्यात आलेली ध्वनिरोधक खोली आहे.बाहेरील आवाज आत येऊ नये यासाठी ध्वनिरोधक सामग्रीचा वापर करून रूम तयार करण्यात आलेली आहे.ऑडिओमेट्री रूममुळे कानांची अचूक चाचणी करता येते आणि श्रवण दोषाचे प्रकार निश्चित करता येतात.या रूममुळे बॅकग्राऊंड नॉईज कमीत कमी तयार होत असल्यामुळे श्रवणदोषाचे प्रकार आणि तीव्रता निश्चित करता येते.

ऑडिओमेट्री रूम सेटअप दोन रूम्सचे असून, ऑडिओमेट्री यंत्राचा वापर करून २५० Hz ते ८००० Hz पर्यंत एअर कंडक्शन द्वारे १० ते १२० dB पर्यंत साऊंड स्टिम्युलेशन दिले जाते. तर बोन कंडक्शन द्वारे -१० ते ७० dB पर्यंत साऊंड स्टिम्युलेशन देऊन श्रवण दोषाचे प्रकार आणि तीव्रता निश्चित केली जाते.हियरिंग लॉस (Hearing Loss) किंवा हियरिंग इम्पेयरमेंट (Hearing Impairment) चे निदान झाल्यानंतर श्रवण दोषानुसार उपाययोजना केल्या जातात. यामध्ये सेंसर-न्युरल हियरिंग लॉस (Sensorineural Hearing Loss) असेल तर हियरिंग एड्स (Hearing Aids) साठी पालकांना सुचवले जाते. ज्यात हियरिंग एड ट्रायल (Hearing Aid Trial) हा एक भाग असून ठराविक कालावधीत हियरिंग एड्स चा उपयोग दिसून आला नाही तर कोक्लिअर इम्प्लांट (Cochlear Implant) संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

चित्रकला, हस्तकला

  • कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीत भाषिक विषयांसोबत कला हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.
  • दिव्यांग विद्यार्थी आपल्या मनातील मूक भावना ,सुप्त कल्पना,चित्र हस्तकलेद्वारे सहजरित्या व्यक्त करतात.
  • चित्रकला व हस्तकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कवळ्या बोटांच्या स्नायूंचा विकास होतो.
  • विद्यार्थ्यांची आकलन क्षमता निरीक्षण क्षमता वाढीसाठी कलेची मुलतत्वे ( रेषा, आकार, रंग आणि पोत) यांचा उपयोग केला जातो.
  • प्रत्यक्ष निसर्गात मुलांना घेऊन जाऊन निसर्गघकातून रंग-रूपाचा अनुभव दिला जातो.
  • आधुनिक दृक्–श्राव्य माध्यमा द्वारे विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणातून राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यासक्रमात समावेश केला जातो.
  • मुले हस्तकलेच्या माध्यमातून भावी जीवनात हस्तव्यवसायाचे कौशल्य संपादन करून स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि स्वावलंबी होतात.
  • कलेच्या माध्यमातून दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांचे कला अभिरुची गुण जोपासून पुनर्वसन केली जाऊ शकते.

Early Detection and Intervention Centre

जन्मापासून ० ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये श्रवणदोष लवकर ओळखून, योग्य वेळी उपचार व शिक्षण सुरू केले जाते. लवकर ओळख झाल्यास मुलाचा भाषा, बोलणे, ऐकणे तसेच सर्वांगीण विकास अधिक चांगला होतो.
Early Intervention (लवकर हस्तक्षेप)हस्तक्षेप म्हणजे काय?
श्रवणदोषाचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचार, प्रशिक्षण व शिक्षण सुरू करणे म्हणजे हस्तक्षेप होय.
हस्तक्षेपामध्ये समावेश :

  • योग्य श्रवणयंत्र (Hearing Aid) बसविणे.
  • कोक्लिअर इम्प्लांट (Cochlear Implant) साठी मार्गदर्शन.
  • श्रवण प्रशिक्षण (Auditory Training).
  • बोलण्याचे प्रशिक्षण (Speech Therapy).
  • पालक समुपदेशन (Parent Counseling).
  • जितकी लवकर ओळख, तितका चांगला विकास” हे तत्त्व लक्षात घेता, प्रारंभी ओळख व हस्तक्षेप केंद्र (Early Detection and Intervention Centre) हे कर्णबधिर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Scroll to Top