समुपदेशन
समुपदेशन
विवेकानंद प्रतिष्ठान शाळेतील श्रवण विकास शाळेतील समुपदेशन विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक, भावनिक, सामाजिक व शैक्षणिक स्वास्थ्य जपणे हे समुपदेशन विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तसेच विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये शिकवण्यासाठी काही ग्रुप सेशन्स घेतले जातात. उदाहरणार्थ, स्वतःची सुरक्षितता, प्रामाणिकपणा, आदर करणे या गोष्टी रोल प्ले आणि व्हिडिओ दाखवून मुलांना समजावल्या जातात.तसेच व्यक्तिगत समुपदेशन आणि गट समुपदेशन देखील घेतले जाते. मुलांचा वाढता स्क्रीन टाइम आणि त्यामुळे होणारे परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना विविध माध्यमांद्वारे जागरूक केले जाते. तसेच पालकांची मदत घेऊन पालक समुपदेशन, शिक्षकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी कशा रुजविता येतील याविषयी मार्गदर्शन केले जाते.तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात असू शकते हे ओळखण्यासाठी Draw Man आणि चटजीची अभाषिक घेतली जाते. व त्यानुसार विद्यार्थ्यांना रिपोर्ट समुपदेशन केले जाते.
कर्णबधिर विद्यार्थ्यांना आपली भावना शब्दांत मांडता येत नाही. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे कठीण जाते.अशा वेळी वेगवेगळ्या खेळातुन अॅक्टिव्हिटी मधून त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या जातात.लेखन कौशल्यासाठी रांगोळी व पिठामध्ये लिहिणे , गणित कौशल्य वाढविण्यासाठी खेळातुन शिकविणे,तसेच वर्तन समस्या असेलतर शिक्षकांशी संवाद साधून त्याचा मागोवा घेणे.
